meen sayani and gautam ghosh to be honoured piff award Sakal
पुणे

PIFF Award : सयानी, घोष, गांधी यांना ‘पिफ पुरस्कार’ जाहीर

पिफ महोत्सव १८ ते २५ जानेवारी या कालावधी होणार असून, त्याचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) रेडिओ उद्‌घोषक अमीन सयानी, दिग्दर्शक व अभिनेते गौतम घोष आणि ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्य कलाकार लीला गांधी यांना यंदाचा ‘पिफ पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गीतकार, गायक एम. एम. कीरवानी यांना ‘संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिफ महोत्सव १८ ते २५ जानेवारी या कालावधी होणार असून, त्याचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली) हा उद्‌घाटनाचा चित्रपट दाखविण्यात येईल.

महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जाह‌नू बरूआ, अभिनेते मनोज वाजपेयी, विकास खारगे, अविनाश ढाकणे, शाई गोल्डमन यांच्या उपस्थितीत चित्रपटविषयक मास्टर क्लास होणार आहे. महोत्सवांतर्गत होणाऱ्या ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’

या विषयावरील परिसंवादात अभिनेते आणि निर्माते रितेश देशमुख, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, निखिल महाजन, अभिनेते मंगेश देसाई, लेखक व गीतकार संजय कृष्णाजी पाटील हे सहभागी होणार आहेत. तसेच ‘चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व’ विषयावरही परिसंवाद होणार आहे. महोत्सवात दिग्दर्शक पेट्र झेलेन्का

(झेक प्रजासत्ताक), सिनेमॅटोग्राफर शाई गोल्डमन (इस्राईल), चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रा, मंजू बोरा, सेतारेह इस्कंदरी (इराण), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान), सू प्राडो (फिलिपाइन्स) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका) हे आंतरराष्ट्रीय ज्युरी असणार आहेत, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card Update : रेशनचे धान्य कायमचे बंद होणार, राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांना याद्या जाहीर, केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांचा पुरवठा थांबणार

Deputy CM Eknath Shinde: उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; भाजप विरोधी बाकांवर बसणार!

आमच्या नेत्याला हात लावल्यास फक्त हात कापणार नाही तर....; इराणची थेट ट्रम्पना धमकी

Viral Video : माझ्या मुलीला वाचव ! सुरक्षा भेदून तिने रोहित शर्माचा हात खेचला, एकच गोंधळ उडाला; पोलिसांची पळापळ अन्...

Pune Weather: पुण्यातील तापमानात घट, पुढील दोन दिवस गारठा कायम

SCROLL FOR NEXT