Atheism of Uddhav Thackeray not going to Ayodhya exposed Chandrashekhar Bawankule Sakal
पुणे

Uddhav Thackeray : अयोध्येला न जाणाऱ्या ठाकरेंचा नास्तिकपणा उघड - चंद्रशेखर बावनकुळे

‘‘उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सावरकरांचाही अपमान केला आहे, त्यांना अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतरही ते अयोध्येला गेले नाहीत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सावरकरांचाही अपमान केला आहे, त्यांना अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतरही ते अयोध्येला गेले नाहीत, मतांच्या राजकारणासाठी ते किती खाली गेले आहेत, हे स्पष्ट होत आहे.

त्यातूनच उद्धव ठाकरे यांचा नास्तिकपणाही पुढे आला आहे.’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

(Atheism of Uddhav Thackeray not going to Ayodhya exposed Chandrashekhar Bawankule)

‘अयोध्या आस्था रेल्वे’ ही विशेष रेल्वे बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी अयोध्येला रवाना झाली. या वेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, ‘‘काँग्रेसने २००८ व २०११ मध्ये अयोध्येतील रामाचा जन्म आणि रामसेतू हे दोन्ही घटना काल्पनिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले, त्यानंतर झालेल्या उत्खननानंतर अयोध्येतील रामाचा जन्म व रामसेतू या दोन्ही घटना काल्पनिक नसून सत्य असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात केले. या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने श्री राम मंदिरासाठीचा निकाल दिला.’’

अयोध्या येथे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी जाऊ द्यावे, भाजपचे पदाधिकारी, मंत्री तेथे गेल्यास सर्वसामान्य भाविकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे पदाधिकारी, मंत्र्यांनी तुर्तास जाऊ नये, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आत्ता अयोध्येला जाता येणार नाही. मात्र आमचा नमस्कार तुम्ही श्रीरामांच्या चरणी अर्पण करा, असे भावनिक आवाहनही बावनकुळे यांनी केले.

कोण गुन्हेगार आहे, हे कसे ठरणार ?

आमच्यासमवेत गुन्हेगार असल्याचे फोटो विरोधक सादर करतात, पण आमच्याकडेही हजारो फोटो आहेत. मुळात आपण सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्याबाजूला कोण येऊन फोटो काढेल, ते व्हायरल करेल, यावर आम्ही कसे लक्ष ठेवणार. कोण गुन्हेगार आहे, हे कसे ठरणार? त्यामुळे संबंधित आरोप हे तत्थहीन असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT