वार्षिक पारितोषिक
वितरण समारंभ
पुणे : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिशुमंदिर हुजूरपागा शाळेत विद्यार्थिनी, पालक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका स्नेहल भावे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुमंदिर शालेय समितीच्या अध्यक्षा व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. सुषमा केसकर होत्या. सिद्धी जाळिंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका अनघा रानडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर उपस्थित होते.
‘महाराष्ट्र हॉटेल
मॅनेजमेंट’चा स्नेहमेळावा
पुणे : नॉन रेसिडेंट इंडियन्स पेरेंट्स ऑर्गनायझेशन(नृपो) संस्थेच्या वतीने शिवाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा स्नेहमेळावा झाला. मेळाव्यात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. प्रचिती सुरु-कुलकर्णी यांनी ‘मुक्ताई -एक मुक्ताविष्कार’ हा कार्यक्रम सादर केला. वैदेही कुलकर्णी संपादित ‘नृपोजगत्’ या अंकाचे प्रकाशन व नृपोमध्ये योगदान देणाऱ्या ५ सदस्यांचा सत्कार डॉ. पांडे यांच्या हस्ते झाला. नृपोचे अध्यक्ष बी. बी. कुलकर्णी यांनी स्वागत केले. सुरेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्याधर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
मोफत नेत्र
तपासणी शिबिर
पुणे : लोकनेते हनुमंतराव साठे फाउंडेशन, जनसेवा फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन युवक रिपाई (आठवले) अध्यक्ष वीरेन साठे यांच्या हस्ते झाले. दलित चळवळीचे दिवंगत नेते हनुमंत साठे यांच्या स्मरणार्थ शिबिरात सुमारे एक हजार मोफत चष्मांचे वाटप केले. शंभर नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठे फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष, रिपाई युवक सरचिटणीस प्रणीत शिंदे, खंडू शिंदे, सुधीर शिंदे, सोहम कांबळे, प्रीती लोंढे, प्रफुल्ल पारखे, लोकेश शिंदे आदी उपस्थित होते.
कोथरूडमध्ये सूर्यनमस्कार
चॅलेंज कार्यक्रम
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कार चॅलेंज कार्यक्रम कोथरूड येथील घरकुल लॉन येथे आयोजित केला होता. शेकडो लोकांनी यात सहभाग घेतला होते. सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. सूर्य मंत्राचा शरीर व मनशक्तीसाठी फायदे असून लोकांच्या निरोगी आरोग्याची जाणीव निर्माण करण्यासाठी हे सूर्यनमस्कार चॅलेंज आयोजित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.