पुणे

वक्तृत्व स्पर्धा

CD

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
रोहन कवडेहाला प्रथम क्रमांक
पुणे, ता. ३ : श्री शिवाजी मराठा सोसायटी आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वारजे येथील संस्कार मंदिर महाविद्यालयाचा रोहन कवडेहा याने प्रथम क्रमांकासाठीचा देशभक्त केशवराव जेधे करंडक पटकावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तेजस पाटीलने द्वितीय, तर कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तन्वी कांबळेने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राधिका इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन, सदस्य डॉ. सुनील जगताप, कमल व्यवहारे, रघुनंदन जाधव, पद्माकर पवार, महादेव पवार, प्रभारी प्राचार्य डॉ. दीपाली पाटील उपस्थित होते.
डॉ. पांडुरंग कंद व डॉ. विजय लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यश पाटील (बी. के. बिर्ला महाविद्यालय, मुंबई), यश फुलवरे (फर्ग्युसन), शुभम राऊत (ए.एस.एम. महाविद्यालय, चिंचवड), चैतन्य बावधाने (फर्ग्युसन), वृषभ चौधरी (के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. डॉ. संतोष यादव, डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी जरांडे, डॉ. दीपक सुरवसे यांनी आभार मानले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT