Ramesh Pardeshi sakal
पुणे

Ramesh Pardeshi : अभिनेता परदेशी यांना नशेत असलेल्या दोन युवतींचा व्हिडिओ काढणे भोवले; महिला आयोगाकडे तक्रार

कोथरूड परिसरातील ‘एआरएआय’ टेकडीवर नशेत असलेल्या दोन युवतींचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या अभिनेता रमेश परदेशी यांच्याविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूड परिसरातील ‘एआरएआय’ टेकडीवर नशेत असलेल्या दोन युवतींचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या अभिनेता रमेश परदेशी यांच्याविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत महिला आयोगाने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवावा, असे पत्र कोथरूड पोलिसांना पाठवले आहे.

टेकडीवर शनिवारी (ता. २४) सायंकाळी दोन युवती बेधुंद अवस्थेत आढळून आल्या होत्या. तो व्हिडिओ परदेशी यांनी रविवारी समाज माध्यमावर प्रसारित केला होता. त्यात संबंधित युवतींचे चेहरे दिसून येत होते. दरम्यान, याबाबत मुंबईतील पत्रकार नेहा पुरव यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

त्यावर आयोगाने या प्रकरणी योग्य ती नियमानुसार चौकशी करून कार्यवाही करावी, तसेच महिला आयोग कार्यालयास वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवावा, असे पत्र कोथरूड पोलिसांना पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT