पुणे, ता. ३ ः राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेकडून रविवारपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पल्स पोलिस लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम शनिवारपर्यंत (ता. ९) सुरू राहणार आहे. शहरातील सुमारे तीन लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेतली होती. त्यांनी शहरात पोलिओ डोस देण्याच्या कामाचा आढावा घेत, मोहीम योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. रविवारी, या मोहिमेचा प्रारंभ झाला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते नारायण पेठ येथील कलावतीबाई मावळे दवाखान्यात बालकास पोलिओचा डोस देऊन मोहिमेस सुरुवात केली. या वेळी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक व राज्य लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण वेदपाठक, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे आदी उपस्थित होते.
शहरात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिस डोस देण्याची मोहीम महाशिवरात्रीचा दिवस वगळता ९ मार्चपर्यंत सुरू असणार आहे. सुमारे तीन लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्याचवेळी १० लाख ३५ हजार ३३५ घरांना भेटी देऊन केंद्रावर डोस दिला गेल्याची खात्री केली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी महापालिकेच्या हद्दीतील विविध दवाखाने, झोपडपट्ट्या, ट्रान्सीट बूथ येथे भेट देऊन मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली.
इथे असेल डोस देण्याची सुविधा
- महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे ५४ दवाखाने
- महापालिकेची १९ प्रसूतिगृहे
- वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी लसीकरण केंद्र
- बसस्थानके, मेट्रो स्टेशन्स, रेल्वे स्टेशन, विमानतळ, उद्यानांच्या ठिकाणीही लसीकरण केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.