pune traffic transport changes senapati bapat road range hill road  Sakal
पुणे

Pune Traffic : सेनापती बापट रस्ता व रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेतील बदलांमुळे काहीसा दिलासा

गणेशखिंड रस्त्यावरील सेनापती बापट रस्ता व रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सोमवार (ता. ४) पासून बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Traffic News : गणेशखिंड रस्त्यावरील सेनापती बापट रस्ता व रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सोमवार (ता. ४) पासून बदल करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या बदलामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक प्रवाही होण्यास मदत झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (आचार्य आनंदऋषीजी चौक) येणाऱ्या रस्त्यावर कॉसमॉस बॅंक ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने तेथे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे.

आचार्य आनंदऋषीजी चौकात महामेट्रो, बहुमजली उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी चतुःश्रुंगी वाहतूक पोलिसांच्या शाखेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाणारे ‘एसबी जंक्‍शन’ व शिवाजीनगरहून येऊन रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनांना ‘रेंजहिल्स कॉर्नर’ऐवजी, संबंधित दोन्ही रस्त्यांवरील वाहनांना कॉसमॉस बॅंकेसमोरून वळण्यासाठी (यू टर्न) व्यवस्था केली. सोमवारी सायंकाळपासून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या प्रायोगिक बदलाची अंमलबजावणी सुरू केली.

अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला ‘ब्रेक’

फिरोदिया बंगल्यापासून ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ई-स्क्वेअरर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी हा परिसरात रस्ता अरुंद झाला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागत असल्याची सद्यःस्थिती आहे. रहदारीच्या वेळी वाहतूक अक्षरशः संथ होऊ लागली आहे. बाणेर रस्त्यावरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, तेथेही रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक संथ झाली आहे.

बफर रस्त्यावर असे आहे वेळेचे नियोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रस्त्याला पोलिस पेट्रोल पंपापर्यंत जाणाऱ्या वाहनांसाठी ‘बफर रस्ता’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत वाहनचालकांना बाणेर रस्त्यावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकापर्यंत येता येईल, तर दुपारी बारा ते सकाळी सात या वेळेत बाणेरकडे नियमितपणे वाहतूक सुरू राहणार आहे.

तसेच सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना पाषाण रस्त्यावरून अभिमानश्री चौक येथून बाणेर रस्त्याकडे जावे लागणार आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंकेसमोरील रस्त्यावर सेनापती बापट रस्त्याकडे व रेंजहिल्सकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या वाहनांना जाण्यासाठी ‘यू टर्न’ केला आहे. त्यामुळे शिवाजीनगरकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे. फिरोदिया बंगला, कॉसमॉस बॅंक, एबीआयएल येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास येथील वाहतूकही सुरळीत होईल.
- शफील पठाण, वाहतूक पोलिस निरीक्षक, चतुःश्रुंगी विभाग

शिवाजीनगरहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकापर्यंत जाताना वाहतूक कोंडीमुळे एक तास वाया जात होता. आता मात्र वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याने वाहतूक कोंडीपासून सध्या तरी आम्ही मुक्त झालो आहोत.
- अनामिक जाधव, संगणक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT