पुणे

आरटीई

CD

आरटीई राखीव जागांवरील
प्रवेशाची प्रक्रियेला प्रारंभ
पुणे, ता. १० : राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे. २०२४-२५ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशास पात्र शाळांची पडताळणी सुरू झाली आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर शाळांनी माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल.
शाळांना नोंदणीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत आहे. ही नोंदणी आणि प्रवेशाच्या रिक्त जागांचा तपशील आल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा असेल तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही. राज्यातील लाखो पालक दरवर्षी आरटीईअंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. या प्रवेश प्रक्रियेला यंदा उशीर झाला आहे.
शाळांची नोंदणी, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरणे, ऑनलाइन सोडत (लॉटरी), निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी अशा टप्प्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शाळांच्या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होईल. तोपर्यंत पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT