पुणे

जीवनशैलीशी निगडीत आजारांच्या मुळाशी स्थूलता

CD

पुणे, ता. १० : बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलता वाढत असून, त्यातूनच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार वाढत आहे. एकप्रकारे स्थूलता ही जीवनशैलीशी निगडित आजारांचे मुळ आहे, असे मत पुण्यात आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. जागतिक स्थूलता विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळ फाउंडेशन आणि आलोह क्लिनिकच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.

स. प. महाविद्यालयात आयोजित या परिसंवादाला वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, बॅरियाट्रीक सर्जन डॉ. शशांक शहा, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ आणि मुख्य अतिथी म्हणून लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एस. जी. पाटणकर उपस्थित होते. जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये लठ्ठपणाची भूमिका, भारतातील वाढते प्रमाण आणि त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक बाबींवर या वेळी चर्चा झाली.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे म्हणाले, ‘‘मधुमेह हा साखरेशी नाही तर स्थुलतेशी निगडीत आजार आहे. एकप्रकारे स्थूलता हा आजारांचा राजा आहे. त्यामुळे स्थूलता वाढू नये म्हणून व्यायाम आणि योग्य आहाराकडे लक्ष द्यायला हवे.’’ स्थुलतेमुळे शरीरावर होणारे परिणाम डॉ. सुरेश शिंदे आणि सुचित्रा पाचपांडे यांनी समजाऊन सांगितले.

डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘देव पुजेबरोबरच देहपूजा महत्त्वाची आहे. त्यासाठी वेळ काढून सकस आहार आणि व्यायाम करायला हवा. व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.’’ डॉ. शहा म्हणाले, ‘‘प्रमाणाबाहेरील लठ्ठपणा आहारावर नियंत्रण ठेऊन कमी करणे शक्य नाही. अशावेळी बॅरियाट्रीक सर्जरीचा उत्तम पर्याय आहे. यामुळे लठ्ठपणा आवाक्यात येतो. त्याचबरोबर निगडित असलेल्या इतर आजारांनाही फायदा होतो.’’

मांसाहार करावा की शाकाहार?
उत्तम आहारासाठी मांसाहार की शाकाहार, हा खरं तर सर्वांच्याच मनातील प्रश्न. यावर उत्तर देताना तज्ज्ञ म्हणाले, ‘‘प्रथिनांचे प्रमाण जास्त आणि कर्बोदके कमी असलेला आहार घ्यायला हवा. शाकाहारी व्यक्तीने डाळी, ब्रोकली आदी प्रथिने जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. तर मांसाहारी लोकांनी ‘रेड मीट’ टाळावे. शक्य झाल्यास अंडी खावी.’’

पाणी जास्त पिणे योग्यच
पाणी शरीरासाठी केव्हाही चांगले असे तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘किडनी विकार असलेली व्यक्ती सोडता इतर सर्वांसाठी पाणी जास्त पिणे चांगले आहे. जेवणाआधी किंवा नंतर केव्हाही पाणी पिता येईल.’’

फोटो ः 12108

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : सरकारने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्यावर टीका करणे हेच विरोधी पक्षाचे काम- खासदार उपेंद्र कुशवाह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT