पुणे

बेकायदा बांधकाम काढण्यास सुरवात

CD

पुणे, ता. १० : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील बेकायदा बांधकाम स्वत:हून काढून घेण्याचा निर्णय दर्ग्याच्या विश्वस्तांनी घेतला. त्यानुसार, शनिवारी रात्रीपासून बेकायदा बांधकाम काढून घेण्यास सुरवात करण्यात आली. या वेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ छोटा शेख सल्ला दर्गा आहे. येथील बेकायदा बांधकाम काढण्याबाबत महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही विश्‍वस्तांनी त्यावर कारवाई केली नव्हती. दरम्यान, शुक्रवारी रात्री दर्ग्याच्या परिसरात महापालिका कारवाई करणार असल्याची अफवा पसरल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई होणार नसल्याचे सांगत जमावाला शांत केले. शनिवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह दर्ग्याच्या विश्वस्तांची बैठक झाली. या बैठकीमध्ये बेकायदा बांधकाम स्वतःहून काढून घेण्याचा निर्णय विश्‍वस्तांनी जाहीर केला होता.

दरम्यान, विश्‍वस्तांनी शनिवारी रात्रीपासूनच स्वतःहून बेकायदा बांधकाम काढण्याच्या कामाला सुरवात केली. भिंती जाड असल्याने त्या काढण्यासाठी विलंब लागत होता. रविवारी दिवसभर तसेच रात्री देखील भिंती पाडण्याचे काम सुरु होते. बांधकाम काढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महापालिकेने बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी ठेवले असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT