पुणे

अन् तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

CD

कसबा पेठेतील प्रार्थनास्थळाबाबत काही समाजकंटकांनी अफवा पसरविल्याने शुक्रवारी रात्री या भागात अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांची कुमक मागविण्यात आली. या भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या वेळी जमावातील काहीजण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः: पोलिस आयुक्त अमितेश कुमार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, संभाजी कदम, रोहिदास पवार, हिंमत जाधव, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे, रुक्मिणी गलांडे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यांनी जमावाला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करीत कौशल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी कुंभार वेस आणि पवळे चौकात बॅरिकेडस लावण्यात आले होते. काही सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही जमावाला शांत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुसऱ्या दिवशी शनिवारी पोलिस आयुक्तांनी प्रार्थनास्थळाचे विश्वस्त, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत विश्वस्तांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि अखेर तणाव निवळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT