पुणे

तोडफोड

CD

शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना सुरूच

पुणे, ता. १० : शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबत नसल्याचे दिसून येत आहे. हडपसर परिसरातील मांजरी बुद्रुकमध्ये गुंडांच्या टोळक्याने शनिवारी (ता. १०) मध्यरात्री दोघांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली.
या प्रकरणी ओमप्रकाश देशराज सिंग (वय २६, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखी तरुणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश ऑर्डरची डिलिव्हरी देण्यासाठी मांजरी बुद्रूक येथील गवळी वस्तीत गेले होते. त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने ओमप्रकाश आणि त्यांचे सहकारी प्रथमेश परमेश्वर समुद्रे (वय १९, रा. झेड कॉर्नर, मांजरी) यांना मारहाण केली. गुंडांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर दुचाकीचे नुकसान करण्यात आले. इतर वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे, डी. जी. सोनटक्के घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT