Sassoon Hospital sakal
पुणे

Sassoon Hospital : कार्यभारा’साठी नाट्यमय घडामोडी ; ‘ससून’च्या वैद्यकीय अधीक्षकपदावर दोघांचा दावा

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदाच्या कार्यभाराचे हस्तांतर करताना सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदाच्या कार्यभाराचे हस्तांतर करताना सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. आयुक्तांचे पत्र दाखवत एकाने पदावर दावा सांगितला, तर दुसऱ्या अधिकाऱ्याने अधिष्ठात्यांनी पदमुक्त होण्याचा आदेश न दिल्याचा दाखला देत पदाची सूत्रे हस्तांतर करण्यास नकार दिला. अखेर अधिष्ठात्यांच्या आदेशानंतर या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला.

ससून रुग्णालयातील गेल्या दोन वर्षांमधील आठव्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा वाद ससून रुग्णालयात सोमवारी रंगला. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून मिळालेल्या आदेशाच्या आधारे डॉ. यलप्पा जाधव यांनी या पदाची सूत्रे शनिवारी हाती घेतली. रविवारी सुटीच्या दिवसानंतर सोमवारी सकाळी ते अधिष्ठाता कार्यालयात येऊन रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले.

दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक असलेल्या डॉ. अजय तावरे यांनी कार्यालयात येऊन कामकाजाला सुरुवात केली. रुग्णालयाची पाहणी करून कार्यालयात दाखल झालेल्या डॉ. जाधव यांना डॉ. तावरे अधीक्षकांच्या खुर्चीत बसलेले दिसले. या वेळी डॉ. जाधव यांनी आपल्याला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्त कार्यालयातून अधीक्षकपदावर नियुक्त केल्याचा आदेश आल्याचे पत्र दाखविले.

त्यावर डॉ. तावरे यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. उलट हे पद सोडू नये, असे पत्र डॉ. काळे यांनी डॉ. तावरे यांना दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एका पदासाठी दोन जणांनी दावा सांगितल्याचे चित्र काही काळ निर्माण झाले होते.

या दरम्यान, काही वेळानंतर डॉ. काळे यांनी दुसरे पत्र पाठवून डॉ. तावरे यांनी डॉ. जाधव यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकपदाची सूत्रे द्यावी, असे पत्र दिले. त्यानंतर या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला. डॉ. तावरे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. जाधव यांच्याकडे सूत्रे सोपविण्याचे सोपस्कार पूर्ण केले.
डॉ. जाधव म्हणाले, “ससून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णावर प्रभावी उपचार मिळतील, यावर भर देण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT