Advocate Academy sakal
पुणे

Advocate Academy : वकिलांच्या प्रशिक्षणासाठी अकादमी होणार

राज्यातील वकिलांना त्यांचे कौशल्य अपडेट व्हावे, यासाठी ठाण्यातील उथ्थनमधील ज्युडिशियल अकादमीच्या धर्तीवर ॲडव्होकेट अकादमी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने तळोजा एमआयडीसीमध्ये दोन एकरांचा भूखंड मंजूर केला.

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील वकिलांना त्यांचे कौशल्य अपडेट व्हावे, यासाठी ठाण्यातील उथ्थनमधील ज्युडिशियल अकादमीच्या धर्तीवर ॲडव्होकेट अकादमी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने तळोजा एमआयडीसीमध्ये दोन एकरांचा भूखंड मंजूर केला. अशा अकादमीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचा प्रस्ताव ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा’कडून राज्य शासनास देण्यात आला होता.

त्यानुसार ही जागा मंजूर करण्यात आली. त्यासाठी एक रुपयांचे नाममात्र वार्षिक शुल्क आकारून ९९ वर्षांचे करार करण्यात आला आहे. बांधकामासाठी कौन्सिलच्या ठेवींमधून १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासंदर्भात कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम देसार्इ, तसेच अध्यक्ष व इतर सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

पुढील सुमारे तीन ते चार महिन्यांत बांधकामाचा आराखडा मंजूर होर्इल. त्यानंतर बांधकाम सुरु होईल, अशी माहिती कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली. ठाण्यातील कळवा येथे अकादमीसाठी अडीच एकराचा भूखंड मंजूर करण्यात आला आहे. मात्र जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. तेथेही अकादमी उभारण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत जागेचा ताबा मिळाल्यानंतर तेथील अकादमी कशी असावी, याबाबतचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती कौन्सिलचे सदस्य ॲड. जयंत जायभावे यांनी दिली.

वकिलांना काय फायदा?

  • नवोदित वकिलांना विधी क्षेत्रातील विविध बाबींचे प्रशिक्षण मिळणार

  • कायदा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी केंद्र उपलब्ध होणार

  • वरिष्ठांचे ज्युनियर वकिलांना मार्गदर्शन मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार

  • विधी क्षेत्रातील अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी सहजासहजी उपलब्ध होणार

अकादमीत काय असणार?

  • प्रशिक्षण देण्यासाठी हॉल

  • प्रशिक्षणासाठी आलेल्या वकिलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था

  • प्रशस्त वाचनालय

  • वकिलांचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी विधी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती

  • अकादमीत येणाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा

  • प्रमाणपत्र असलेले अभ्यासक्रम

वकिलांच्या प्रशिक्षणासाठी अकादमी सुरू करायची असून त्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव कौन्सिलने राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार रायगडमधील तळोजा आणि ठाण्यात कळवा येथे भूखंड मंजूर करण्यात आले. तळोजा येथे अकादमी सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ठाण्यातील जागेबाबत अद्याप काही प्रक्रीया बाकी आहेत. या दोन्ही अकादमींमुळे नवोदित तसेच विविध क्षेत्रात प्रॅक्टीस करणाऱ्या वकिलांना विविध बाबींचे प्रशिक्षण तज्ज्ञांमार्फत मिळेल. देशात प्रथमच अशा अकादमी तयार होणार आहेत. त्यामुळे त्या इतर राज्यांसाठी आदर्श ठरणार आहेत.

- ॲड. राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT