पुणे

‘आर्ट मॅजिक’चा आज शेवटचा दिवस

CD

पुणे, ता. २५ : विविध ऋतूतील निसर्गाच्या रंगछटा, प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब हावभाव, देवदेवता, व्यक्तिचित्र, कार्टून, विविध देशातील पर्यटनस्थळे अशा चित्रांतून रंगाची जादू कॅनव्हासवर रेखाटलेल्या ‘आर्ट मॅजिक २०२४’ चित्रकला प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. प्रदर्शन शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत विनामूल्य पाहता येईल.
आर्ट मॅजिक संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुकीम तांबोळी व चंद्रशेखर कुमावत उपस्थित होते. प्रदर्शनात एकूण १२० चित्रांचा समावेश असून चाळीसहून अधिक कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. महालक्ष्मी पवार आणि अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले. अनुजा गुर्जर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, तनया गडाळे, रोहित काळे, आदिती काशीद, नीरज शहा, इशिता शहा, श्‍लोक चव्हाण, वेदांत अवघडे, सान्वी खळदकर, श्लोक धुमाळ, ऋचा पोतदार, शौनक चव्हाण वाघोलीकर, लावण्या गायकवाड यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे. प्रदर्शनात ऍक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कलर पेन्सिल, ट्राय पेस्टल तसेच रेझीन आर्ट, चारकोल, परस्पेक्टिव्ह या माध्यमातील विविध चित्रांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT