पुणे

पश्‍चिम महाराष्ट्रातील शंभर गावांमध्ये पोचले "भूमी सुपोषण व संरक्षण अभियान''

CD

पुणे, ता. २५ : शेतीसाठी रासायनिक खतांचा होणारा वापर थांबवून शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, यासाठी अक्षय कृषी परिवाराच्या वतीने ‘भूमी सुपोषण व संरक्षण’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे आत्तापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रातील १०० गावांमधील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गोसेवा गतीविधी पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या गो-आधारित शेती सहप्रमुख पूनम राऊत यांनी दिली. अभय कृषी परिवाराच्या वतीने मोतीबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी गोसेवा गतीविधी पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख व प्रगतशील शेतकरी जगन्नाथ मगर उपस्थित होते.
राऊत म्हणाल्या, शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार केलेल्या खतांचा वापर होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने भूमी सुपोषण व संरक्षण अभियान राबविले जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये अभियान पोचले असून अक्षय्य तृतीयेपर्यंत १५० गावांपर्यंत आम्ही अभियान पोहोचविणार आहोत.’
मगर म्हणाले, ‘पुढची पिढी सशक्त बनविण्यासाठी, पाण्याचे व्यवस्थापन व्हावे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. सेंद्रिय खतांमुळे शेतीचा खर्च वाचतो, उत्पादनही वाढते. त्याचबरोबरच विषमुक्त अन्न प्रत्येकाला मिळण्यास मदत होते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT