Pune Weather Update sakal
पुणे

Pune Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका वाढणार

पुणेकरांनो, एप्रिलचे शेवटचे पाच दिवस कडक उन्हाचे ठरणार आहेत. पाचपैकी तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, एप्रिलचे शेवटचे पाच दिवस कडक उन्हाचे ठरणार आहेत. पाचपैकी तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारच्या (३८.५) तुलनेत गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुणे शहरात येत्या शुक्रवारी (ता. २६) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर अंशतः ढगाळ होईल. त्यामुळे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे. या दरम्यान कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल. शनिवारी (ता. २७) आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज आहे. रविवारी (ता. २८) दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरणाचा अंदाज असल्याने अंशतः पारा कमी होईल. नंतर एप्रिलच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये (ता. २९ आणि ३०) कमाल तापमान चाळीशीपर्यंत वाढेल, असे खात्यातर्फे सांगण्यात आले.

रात्री उकाडा वाढला
दिवसभर उन्हाच्या चटक्यात होरपळणाऱ्या पुण्यात रात्रीचा उकाडाही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पंखा, कुलर आणि ‘एसी’शिवाय झोपणे शक्य होत नाही. अशा वेळी पुढील पाच दिवस किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

असा वाढला रात्रीचा उकाडा
तारीख .............. किमान तापमान (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
२१ एप्रिल ............. २०.९
२२ ........................ २१.४
२३ ........................ २१.७
२४ ........................ २२.२
२५ ........................ २२.९


  • कमाल तापमान (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
    वडगाव शेरी ............. ४१.३
    कोरेगाव पार्क ............ ४१
    हडपसर ..................... ४०.७
    मगरपट्टा ................. ४०
    पाषाण ................... ३९.२
    एनडीए ................... ३८.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: काँग्रेसमधील गटबाजी उफाळली! पालिकेतील अपयशानंतर मुंबई अध्यक्ष हटवण्याची मागणी

Chha. Shivaji Maharaj Memorial : शिवरायांच्या स्मारकासाठी हरियाना सरकारचा शब्द; पानिपतच्या रणांगणावर मराठा शौर्याला सलाम

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

नेहा शितोळे, सोनाली पाटीलचा राकेशला पाठिंबा; म्हणाल्या "मी एक महिला असून.."

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची वसुली 'जागेवर' ठप्प! सरकारच्या स्थगितीमुळे ४० कोटींवरच अडकला आकडा

SCROLL FOR NEXT