Pune Junction esakal
पुणे

Pune Railway Station: आई-वडिलांसह झोपलेल्या बालकाला रेल्वे स्थानकावरून पळवून नेले

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाला पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

CD

पुणे, ता. २८ ः पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाला पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रावण अजय तेलंग असे बालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अजय तेलंग फिर्याद दिली आहे.

तेलंग दांपत्य मूळचे भुसावळचे आहे. सासूला भेटण्यासाठी तेलंग पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री ते रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांच्या मुलाला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली तेव्हा श्रावण नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर घाबरलेल्या दाम्पत्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी तातडीने ताब्यात घेतले. यात मुलाला पळवून नेणारी व्यक्ती दिसून आली. याबाबत माहिती मिळाल्यास सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे (मोबाईल ९४२२४२७८४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT