पुणे

भाषा शुद्धीकरणाची प्रक्रिया निश्चित व्हावी : डॉ. देगलूरकर

CD

पुणे, ता. २८ : ‘‘केवळ पुस्तके छापून भाषा समृद्ध होत नाही तर मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी भाषेच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली पाहिजे,’’ असे मत पुरातत्त्वशास्त्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उज्ज्वल ग्रंथ भांडारचे शिरीष घाटपांडे यांना डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. देगलूरकर बोलत होते.
यंदाचा ‘साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार’ लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना देण्यात आला. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या प्रत्यक्ष उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारू शकल्या नाहीत. यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ. उमा कुलकर्णी, ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे’चे अध्यक्ष राजीव बर्वे, स्नेहसुधा कुलकर्णी, पराग लोणकर आणि दत्तात्रेय पाष्टे उपस्थित होते.
कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती, दिवाळी अंक निर्मिती हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ‘भाषांतर युग ते अनुवाद युग’ विषयावर डॉ. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले.
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी प्रकाशकांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.
घाटपांडे म्हणाले,‘‘आयुष्यात ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. लहानपणापासून ग्रंथांच्या अंगाखांद्यावर खेळलो आणि त्यांच्याशी दृढ नाते तयार झाले. या क्षेत्रात काम करताना खऱ्या अर्थाने समाधान लाभले.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव बर्वे यांनी, तर सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले. किरण आचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT