पुणे

माळी पदभरतीचे रोपटे धरेना मूळ!

CD

पुणे, ता. २९ ः शहराच्या बहुतांश भागातील उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. असे असतानाच आवश्‍यक शंभर माळी पदभरतीची महापालिकेने केलेली घोषणा हवेतच विरल्याची चिन्हे आहेत. पदभरतीची प्रक्रिया अजूनही संथ गतीनेच सुरू आहे. त्यामुळे उद्यानांची देखभाल दुरुस्ती होणार तरी केव्हा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
देशात बंगळूरनंतर सर्वाधिक उद्याने असणारे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. पाच ते सहा उद्याने नव्याने तयार होत आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील काही उद्याने वगळता बहुतांश भागातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानांमधील खेळणी, व्यायाम साहित्याला गंज लागला आहे. खेळणी खराब झाली असून अनेक ठिकाणी खेळण्यांची मोडतोडही झाली आहे. देखभाल दुरुस्ती, सोईसुविधा, स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. याबाबतची सद्यःस्थिती ‘सकाळ’ने मांडली होती. या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी उद्यानांची दुरवस्था दूर करण्यासाठी शंभर माळी पदभरती लवकरच करण्याची घोषणा केली होती. मात्र ढाकणे यांच्या बदलीनंतर या प्रश्‍नाकडेही दुर्लक्ष झाले.

अशी आहे स्थिती
पुणे महापालिकेने माळी पदभरतीबाबत केलेल्या घोषणेला दोन ते तीन महिने उलटून गेले आहेत. अजूनही त्यामध्ये फार प्रगती झालेली नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याअंतर्गत येणाऱ्या पुणे कृषी महाविद्यालय, गणेशखिंड फळ संशोधन केंद्र यांच्याकडून माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी माळी महापालिकेच्या उद्यानांसाठीच्या माळी पदभरतीसाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित संस्थांना पत्र पाठविले आहेत. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला गती मिळण्याची शक्‍यता उद्यान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. असे असले तरीही ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागू शकतो, हे उद्यान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी माळी पदभरतीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी महाविद्यालय, गणेशखिंड फळ संशोधन केंद्रांना पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडे पाठपुरावाही केला आहे. त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
- अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, पुणे महापालिका

...तरी मनुष्यबळ तेवढेच
मागील काही वर्षांत महापालिकेकडून वेगवेगळ्या भागांत उद्याने तयार करण्यात आली आहेत. मात्र सध्या कर्मचारी कमी आहेत. सेवानिवृत्तीसह अन्य काही कारणांमुळे दोन ते तीन वर्षांत ही संख्या आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकीकडे उद्याने वाढत असली, तरीही कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढत नाही.

दृष्टिक्षेपात
शहरातील उद्याने - २१०
नव्याने होणारी उद्याने - ८ ते ९
उद्यान विभागाकडील एकूण कर्मचारी - ६३
उद्यान विभागाकडे सध्या उपलब्ध कर्मचारी - ५३
उद्यान विभागाला आणखी कर्मचाऱ्यांची गरज - १७५
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT