पुणे

आदि शंकराचार्यांवरील वेबसिरीजचा ट्रेलर लाँच

CD

बंगळूर, ता. १३ : आर्ट ऑफ लिव्हिंगने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘आदि शंकराचार्य’ या पहिल्या वेब सिरीजचा ट्रेलर लॉन्च केला. ही निर्मिती आदि शंकराचार्यांच्या सुरुवातीच्या काळातील कथा सादर करणार आहे. ज्यामध्ये ते आध्यात्मिक नैतिकता आणि परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारतभर प्रवास करतात. पहिल्या भागात १० भाग असतील. प्रत्येक भाग अंदाजे ४० मिनिटांचा असेल आणि आदि शंकराचार्यांच्या आयुष्यातील पहिल्या आठ वर्षांवर आधारित असेल.
श्री श्री पब्लिकेशन ट्रस्टचे विश्वस्त नकुल धवन म्हणाले, ‘‘आदि शंकराचार्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांचे नाव प्रसिद्ध आहे पण त्यांची जीवनकथा अनेकांना माहीत नाही. त्यांचे आयुष्य लहान परंतु महत्त्वपूर्ण होते. ज्यामध्ये त्यांनी देशभर प्रवास केला आणि देशाच्या सांस्कृतिक ‘फॅब्रिक’ला एकरूप केले. त्यांनी स्थापित केलेल्या परंपरा आजही जिवंत आहेत आणि ते भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे शिल्पकार आहेत’’.
या प्रकल्पाबद्दल बोलताना दिग्दर्शक ओंकार नाथ मिश्रा म्हणाले, ‘‘ही मालिका महान आदि शंकराचार्यांना समर्पित आहे, ज्यांच्या बुद्धी, ज्ञान आणि आध्यात्मिक सामर्थ्याने या राष्ट्राला आकार दिला. जेव्हा भारताची ३०० हून अधिक राज्यांमध्ये विभागणी झाली तेव्हा आदि शंकराचार्यांनी देशभर प्रवास करून सनातन धर्माच्या झेंड्याखाली एकत्र केले. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरणासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे आणि आम्ही त्यांची कथा आधुनिक प्रेक्षकांच्या आवाजात जिवंत करू इच्छितो’’. या महान राष्ट्रीय नायकाची प्रेरणादायी जीवनकहाणी जगभरातील प्रेक्षकांसमोर आणणारी ही मालिका आर्ट ऑफ लिव्हिंग ॲपवर १ नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल.

वेळोवेळी ज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. आदि शंकराचार्यांनी ज्ञानाचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी भक्ती, ज्ञान आणि कृती यांची सांगड घातली. जीवन हे दुःख नसून आनंद आहे, असा त्यांचा संदेश होता.
- श्री श्री रविशंकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nagpur POCSO Case : अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लग्न; नागपुरात पॉक्सोसह गुन्हा, मुख्य आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT