पुणे

ऐन पंचविशीतली आंतररोटरी एकांकिका स्पर्धा

CD

‘रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर’ हा ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१’ मधील नावाजलेला क्लब आहे. गेली २४ वर्षे हा क्लब आंतर रोटरी एकांकिका स्पर्धा आयोजित करीत आहे. हे या स्पर्धेचे २५ वे वर्ष आहे. सध्या भरत नाट्य मंदिरात एकांकिका स्पर्धा सुरू असून रविवारी (ता. २०) या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. त्यानिमित्त....
- मंजिरी धामणकर


मराठी माणूस नाटकवेडा. नाटक बघण्याचं तर त्याला वेड असतंच; पण प्रत्यक्ष रंगभूमीला एकदा तरी पदस्पर्श व्हावा अशीही सुप्त इच्छा अनेकांच्या मनात असते. पण ‘आपल्याला कसं जमेल? संवाद कसे पाठ होतील? ऐनवेळी विसरलो तर?’ अशा अनेक शंकाकुशंका मनात असतात. काही जणांनी शाळा-कॉलेजमध्ये काम केलेलं असतं. पण पुढे केवळ प्रेक्षक म्हणूनच नाटकाशी संबंध राहिलेला असतो. अशा हौशी कलाकारांना ‘रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर’ने रोटरी वर्ष २०००-२००१ मध्ये एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम हक्काचा रंगमंच उपलब्ध करून दिला.
रोटरी क्लबचे सदस्य सी. डी. महाजन यांनी त्यावर्षीचे अध्यक्ष अच्युत गोखले याच्यासमोर ही कल्पना मांडली आणि अच्युत स्वतः नाटकवेडा असल्यामुळे त्याने ती उचलून धरली. क्लबचे सदस्य श्रीनिवास गोडबोले यांच्या पत्नी लेखिका मंगला गोडबोले यांनी मार्गदर्शन केलं आणि स्पर्धेचं पहिलं वर्ष यशस्वीपणे पार पडलं. पारितोषिक वितरणाला दिलीप प्रभावळकरांसारखे अध्यक्ष पहिल्याच वर्षी लाभले. तेव्हापासून आजपर्यंत यशाची चढती कमान राहिली आहे.
एकांकिका सादर करणं हा जरी आनंदाचा भाग असला तरी बक्षीस मिळावं असं साहजिकच सगळ्यांना वाटतं. ज्यांना बक्षीसं मिळतात त्यांनी परीक्षकांवर खूष होणं, ज्यांना मिळत नाहीत त्यांनी नाराज होणं या गोष्टी अटळच आहेत पण तरीही ते विसरून पुन्हा पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने, किंबहुना अधिकच जोमाने-जिद्दीने पुन्हा स्पर्धेची तयारी करणं यामुळेच तर स्पर्धेने पंचविशी गाठली आहे.
यंदाच्या वर्षाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या या स्पर्धेचं ‘स्व. स्वाती क्षीरसागर एकांकिका स्पर्धा’ असं नामाभिधान झालं आहे. आमच्या क्लबचा जुना सदस्य उद्योजक आणि उत्तम व्हायोलिन वादक शिरीष क्षीरसागर याने आपली दिवंगत पत्नी, उत्तम गाणारी स्वाती क्षीरसागर हिच्या नावे या प्रकल्पासाठी भरघोस देणगी दिली आहे. त्यामुळे स्वातीचं नाव या स्पर्धेशी कायमचं जोडलं गेलं याचं प्रत्येकाला समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Vegetarian Club Sandwich: उकडलेले बटाटे, कुरकुरीत भाज्या अन् आवडीच्या स्प्रेडसह झटपट बनवा चविष्ट व्हेजिटेरियन क्लब सँडविच!

ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर ओसरला; दुपारी उन्हाचा चटका वाढला, जाणून घ्या आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT