पुणे

तिसऱ्या आरोपीलाही लवकरच ताब्यात घेणार : पोलिस आयुक्त

CD

पुणे, ता. १७ : बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या फरार आरोपीलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहर आणि परिसरातील टेकड्यांच्या परिसरात पोलिस गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
गुन्हे शाखेकडून बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला प्रयागराजमधून अटक केली आहे. त्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिस कोठडीतील आरोपींकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी देशाच्या विविध भागात गुन्हे शाखेची पथके पाठविली आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार आहे. तसेच, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

लॉरेन्स बिश्नोई टोळीतील संशयितांवर नजर
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईत झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे याबाबत टिप्पणी करणे संयुक्तिक नाही. आरोपींचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे आणि ते पुण्यात वास्तव्यास असल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. या टोळीशी संबंध असलेल्या संशयितांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी शहराच्या विविध भागांत नाकाबंदी करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचे पारदर्शक पद्धतीने पालन करण्यात येईल. पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही अमितेश कुमार यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad News: धुळे-सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; बारामती अॅग्रोने मान्य केली ३,३११ रुपयांची पहिली उचल

Polio Drops : पुणे महापालिकेच्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना डोस; वंचित बालकांसाठी सोमवारपासून घरोघरी आरोग्य पथके

Nitin Nabin : काही लोक परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, राहुल गांधींवर नितीन नवीन यांची जोरदार टीका

Marathi News Live Updates : ऊसतोड मजूर महिलांची वेदनादायी अवस्था! चार दिवसांची सुट्टी परवडत नाही म्हणून गर्भाशय काढण्याची वेळ?

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद! भारताची सुरुवातच खराब,नेमकी कशी पडली वैभवची विकेट?

SCROLL FOR NEXT