Pune News sakal
पुणे

Pune News : होळी सणासाठी वृक्षतोड केल्यास कारवाई

होळी सणासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे वृक्षतोड करू नये, कोणीही वृक्षतोड करत असल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होळी सणासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे वृक्षतोड करू नये, कोणीही वृक्षतोड करत असल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला. शहरामध्ये रविवारी होळी हा सण मोठ्या आनंदोत्साहत साजरा होणार आहे.

दरम्यान, होळीसाठी लागणाऱ्या गौरी व अन्य वस्तुंची नागरिकांकडून खरेदी करण्यात आली. काही नागरिकांकडून झाडांच्या फांद्या तोडून होळीमध्ये टाकण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून शहरात सुरु आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. या पार्श्‍वभूमीवर होळीच्या सणासाठी नागरिकांनी वृक्षतोड करू नये, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी केले.

झाडे तोडणे, जाळणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडांना हानी पोहचविणे, हा महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यासाठी आर्थिक दंडाचीही शिक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी होळी सणासाठी वृक्षतोड करू नये, कोणी विनापरवाना वृक्षतोड करत असल्यास त्यासंबंधी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त/वृक्ष अधिकारी यांना तत्काळ माहिती द्यावी. १८००१०३०२२२ या टोल फ्री किंवा ९६८९९००००२ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT