Pune Loksabha Constituency : sakal
पुणे

Pune Loksabha Constituency : आधी कसब्याचा शब्द द्या ; मगच प्रचार करू

विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत कसबा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल, असे जाहीर करा. तरच लोकसभा निवडणुकीत काम करू,’’ असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत कसबा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल, असे जाहीर करा. तरच लोकसभा निवडणुकीत काम करू,’’ असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. धुसफूस आत्तापासूनच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या शहर पातळीवरील नेत्यांची बैठक कॉंग्रेस भवनात झाली. बैठकीला सर्वच नेते उपस्थित होते. या वेळी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने या विषयाला हात घातला. त्यानिमित्ताने तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांची बाजू मांडण्याची संधी साधली.

‘कसबा विधानसभा निवडणुकीत यापूर्वी आम्ही भाजपची तळी उचलली. आता आम्ही कॉंग्रेसची तळी उचलत आहोत. सर्व ताकद लावून आम्ही तुम्हाला खासदार करू. परंतु विधानसभेच्या वेळी कसबा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार, असा शब्दा द्या. तरच काम करू’ असा इशाराच थेट एका विभागप्रमुखाने दिला. राष्ट्रवादीच्या एका नेत्यानेदेखील ही संधी साधत ‘कसब्यातून आम्हालादेखील निवडणूक लढवायची आहे,’’ असे सांगितले. त्यावर कॉंग्रेसच्या नेत्याने ‘शिवसेनेतून मनसेत गेले आणि मनसेतून आता कॉंग्रेसमध्ये आले, त्यांना आम्ही संधी दिली. तर तुम्हाला संधी मिळाली पाहिजे.’

काही नेत्यांनी पुढाकर घेत ‘विधानसभेला अजून उशीर आहे. ही निवडणूक होऊ द्या, त्यांनतर बसून यावर बोलू,’’ असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. सर्व पक्षीय नेत्यांची बैठक संपल्यानंतर शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस भवनात स्वतंत्र बैठक घेतली. बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरही उपस्थित होते.बारामती, मावळकडे चला
पुणे लोकसभेसाठी काँग्रेस, तर बारामतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.

मावळसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी बारामती आणि मावळमध्ये आत्ताच प्रचारासाठी जावे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यावर जाऊ नये. तुम्ही तसे केले, तर बारामती आणि मावळ मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्तेही पुण्याकडे येतील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT