पुणे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ‘वेटिंग’

CD

पुणे, ता. ३ ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहनांची खरेदी सुमारे १८ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दुचाकी व चारचाकीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शहरातील विविध शोरूम्समध्ये गर्दी होत आहे. दुचाकीमध्ये मोपेड (विनागिअर) व ई-वाहनांना अधिक मागणी आहे. चारचाकीमध्येदेखील हायब्रीड वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहक किमान पंधरा दिवस आधीच गाडीची बुकिंग करतात. सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दुचाकींमध्ये मोपेड गाड्यांना वेटिंग आहे. हीच स्थिती चारचाकीमधील हायब्रीड वाहनांची आहे. त्यामुळे गाडीचे आधीच बुकिंग करण्यात आले आहे. नुकतीच दहावी व बारावीची परीक्षा संपली आहे. त्याचाही परिणाम वाहन खरेदीवर होणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुण्यात दुचाकी वाहन घेताना पेट्रोलवरील गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी तुलनेने कमी आहे.

मोपेड गाड्यांना वेटिंग
पुण्यात दुचाकीमध्ये सर्वांत जास्त मागणी मोपेड गाड्यांना आहे. ‘अॅक्टिवा’साठी काही शोरूम्समध्ये वेटिंग सुरू झाले आहे. सरासरी १५ ते २० दिवसांचे वेटिंग सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी महिनाभर आधीच गाड्यांचे बुकिंग केले आहे. शिवाय अन्य गाड्यांदेखील चांगली मागणी आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्या असून, सुटीचा हंगाम सुरू आहे. त्याचा फायदा वाहन विक्रीसाठी होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरीदेसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत वाढ होण्याची आशा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत १८ ते २० टक्क्यांची वाढ होईल, असे वाटते.
- प्रदीप सावंत, संचालक, शेलार दुचाकी विक्रेते

दुचाकीत पेट्रोलवरील वाहनांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ग्राहक कमी प्रमाणात शोरूम्समध्ये येत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- संतोष पडवळ, संचालक, यशहोंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT