पुणे

स्पेक्ट्रम पर्यावरणपूरक चळवळीचे पंधराव्या वर्षात पदार्पण ः शहा

CD

पुणे, ता. ८ ः ‘‘पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्पेक्ट्रम संस्थेद्वारे सुरु करण्यात आलेली स्पेक्ट्रम औद्योगिक पर्यावरणपूरक चळवळ यंदा १५व्या वर्षात पदार्पण करीत आहे,’’ अशी माहिती चळवळीचे समन्वयक पंकज शहा यांनी दिली.
शहा म्हणाले, ‘‘पुणे आणि परिसरात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या पन्नास हजारापेक्षा जास्त व्यावसायिक रंग आणि कोटिंग उद्योगाशी निगडित आहे. स्पेक्ट्रम संस्थेद्वारे त्यांच्यापर्यंत चर्चासत्र, कार्यशाळा, प्रबोधन अशा विविध माध्यमाद्वारे पर्यावरणपूरक रंग तंत्रज्ञान पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. रंगामध्ये विषारी पदार्थ टाळणे, कमी वायू उत्सर्जन करणारे रसायन वापरणे, पाणी आधारित रंगांच्या उत्पादनाला प्राधान्य देणे, यासाठी प्रयत्न करणे याबाबत संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.’’
चळवळी अंतर्गत कच्च्या मालाचे सुव्यवस्थित नियोजन, विषारी वायूचे नियमन, मानवी आरोग्य आणि औद्योगिक सुरक्षा, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विझ्युअल मॅनेजमेंट, लीन मॅनेजमेंट, अपायकरी रसायनांची विल्हेवाट कशी करायची, रंगात असलेले विषारी पदार्थ जसे लीड, जस्त, क्रोमियम आदी सरकारी मानकप्रमाणे कमीतकमी कसे ठेवायचे, यासाठी रंग आणि कोटिंग उद्योगक्षेत्रात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंग उत्पादकांपासून ते शेवटच्या घटकापर्यंत प्रबोधन करण्यात येत आहे, असे शहा यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT