पुणे

आयएएस असल्याचे सांगत सावकारी करणाऱ्या महिलेला अटक

CD

पुणे, ता. २७ : राजमुद्रेचा फोटो व्हॉट्स अॅप डीपीला ठेवून त्यावर आयएएस ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणाऱ्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी तिने एका महिलेला दिली होती.

रेणुका ईश्वर करनुरे (वय ३२, रा. सिद्धिविनायक सोसायटी, वडकी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूजा प्रवीण मोरे (३१, रा. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरगुती व्यवसाय करतात. रेणुकाने आपण आयएएस असल्याचे मोरे यांना सांगितले. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी रेणुका हिच्याकडून सुरुवातीला दरमहा पाच टक्के दराने ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन लाख ६८ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात तीन लाख ४८ हजार ६५० रुपयांचे व्याज फिर्यादी यांनी आरोपीला दिले. दोन लाख ६८ हजार रुपयांपोटी त्यांनी आठ लाख आठ हजार ६५० रुपये दिलेले आहेत. असे असतानाही आणखी चार लाख ५५ हजार ५९८ रुपये देणे बाकी असल्याचे ती म्हणत होती. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी ती देत होती. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके अधिक तपास करत आहेत.

महिन्याला सहा हजार रुपये दंड
व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर रेणुका ही केवळ दंडाचे सहा हजार रुपये वसुल करत होती. पैसे न दिल्याने तिने फिर्यादीच्या पतीची कार जबरदस्तीने ओढून नेली होती. अडीच लाख रुपये दिल्यानंतर तिने ती परत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT