पुणे

२०२७ पर्यंत कुष्ठरोगमुक्तीचे ध्येय

CD

पुणे, ता. ७ ः राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचे प्रमाण शून्य करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार २०२५ पर्यंत जिल्हा तसेच तालुका स्तरावर आणि २०२७ अखेर गावपातळीवर कुष्ठरोगमुक्तीचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यातील कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन, त्यांच्यासाठी नोकरीत संधी निर्माण करणे तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्या मुख्य उपस्थितीत या समितीची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी तसेच कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नोकरीच्या संधी व शासकीय योजनांच्या लाभाची व्याप्ती वाढविणे ही या समितीचे मुख्य उद्दिष्टे आहेत. यासाठी कुष्ठरोग शोध अभियान, कुष्ठरुग्ण शून्य असलेल्या गावांचे सर्वेक्षण, स्पर्श जनजागृती अभियानाअंतर्गत आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम, उपक्रम आरोग्य विभाग राबवीत आहे. गेल्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा राज्यातील १० हजार ७८५ कुष्ठरुग्णांनी लाभ घेतला.
----------
महाराष्ट्राची वाटचाल
- राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम १९५५-५६ साली पाहणी
- शिक्षण व उपचार या तत्त्वावर एक उद्देशीय पद्धतीस प्रारंभ
- ९८१-८२ पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पद्धती टप्प्या-टप्प्याने लागू
- १९९५-९६ पर्यंत या योजनेच्या अंतर्गत सर्व जिल्हे आणण्यात आले
- १९८१-८२ मध्ये दर दहा हजारामागे कुष्ठरोगाचे प्रमाण ६२.४० टक्के
- १९९१-९२ मध्ये हे प्रमाणे १४.७० टक्क्यांपर्यंत कमी
- २०२२-२३ मध्ये केवळ १.०२ टक्के प्रमाण
----------
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या सुविधा
- शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या कुष्ठरुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व ठराविक स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया मोफत
- शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना १२ हजार रुपये भत्ता
- शस्त्रक्रिया करणाऱ्या शासकीय आरोग्य संस्थांना रुपये पाच हजार रुपये भत्ता
- पात्र कुष्ठरुग्णांना सर्व शासकीय रुग्णालये व स्वयंभू कुष्ठ वसाहतीमध्ये गरजेप्रमाणे मोफत व्रणोपचार व भौतिकोपचार सेवा
- कुष्ठरुग्णांचे वैद्यकीय, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन
-----------
राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आवास योजना, शस्त्रक्रिया असे लाभ देण्यात येतात. ही नियमित प्रक्रिया आहे. त्यांना अजून काही देता येईल का याची चाचपणी करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयाने बैठक होते. यामध्ये काही स्वयंसेवी संघटनाही मदत करतात.
- संदीप सांगळे, सहसंचालक, कुष्ठरोग व क्षयरोग.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB वर आरोप... ते ५ परदेशी खेळाडूंसह खेळतात; विराट कोहली म्हणतो, मी अजूनही भारतीय... Video

MS Dhoni चा चित्रपट पाहून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला...

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT