पुणे, ता. २२ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रस्त्यावरील मांजरी फाटा येथे ‘एसएसटी’ने (स्थिर निरीक्षण पथक) सुमारे २३ लाखांची रोकड जप्त केली. मंगळवारी (ता. २२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथक आणि स्थिर निरीक्षण पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी खेड शिवापूर टोल नाका परिसरात सापळा रचून सुमारे पाच कोटींची रोकड जप्त केली होती. या घटनेनंतर आज ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर रस्त्यावरील मांजरी फाटा परिसरात एसएसटी पथकाकडून नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी एका मोटारीची तपासणी केली असता त्या मोटारीत २२ लाख ९० हजारांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान, ही रक्कम सिद्धटेक रस्ता, दौंड येथील एका भुसार माल व्यापाऱ्याची असून ती मार्केट यार्ड येथील बँकेत भरण्यासाठी घेऊन जात होते. याबाबत प्राप्तीकर विभाग आणि जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.