abhay vartak sanatan Narendra Dabholkar Murder Case esakal
पुणे

Narendra Dabholkar Murder Case: ‘हिंदू दहशतवादा’चे कुभांड रचणाऱ्यांचा पराभव,सनातन संस्थचे प्रवक्ते अभय वर्तक यांचा दावा

पुण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला. या विषयी सनातन संस्थेची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

CD

पुणे, ता. १० ः डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक निर्दोष असल्याचा निकाल ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने दिला. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात हिंदू दहशतवादाचा संबंध असल्याचे षडयंत्र पुरोगामी चळवळ व शहरी नक्षलवाद्यांनी रचले होते. मात्र या निकालावरून त्यांचे षडयंत्र विफल झाले. हा निकाल म्हणजे हिंदू दहशतवाद्यांचे कुभांड रचणाऱ्यांचा पराभव असल्याचे सनातन संस्थचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितले.


पुण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला. या विषयी सनातन संस्थेची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अभय वर्तक म्हणाले, ‘‘न्यायालयाने विक्रम भावे, डॉ. वीरेंद्र तावडे व ॲड. संजीव पुनाळेकर यांना निर्दोष सिद्ध केले तर सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांना दोषी असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे. सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांसाठी या प्रकरणातील अधिवक्ते हे मुंबई उच्च न्यायालयात या निकाला विरोधात दाद मागणार आहेत. हे दोघे सनातन संस्थेशी निगडित नाहीत’’. पत्रकार परिषदेत सुनील घनवट उपस्थित होते.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- ११ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला
- डॉ. हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांच्या फाजील आत्मविश्वासाचा हा पराभव
- सुरवातीपासूनच या प्रकरणाचा तपास संशयास्पद
- डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर लगेच हिंदू संस्थेचा यात हात असू शकतो असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यामुळे तपासाची दिशा बदलली
- गोव्यातून अटक केलेले मंगेश चौधरी व रसूल अन्सारी हे कबुलीजबाबात आम्हीच डॉ. दाभोलकर यांना मारले असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी तो जवाबच बदलला
- या प्रकरणात १६०० परिवारांची व बँक खात्यांची चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT