BJP Leader Rally File Photo
पुणे

परप्रांतीय नेते प्रचारासाठी पुण्यात

पुण्यात राजस्थान भवन बांधले जावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात देशातील विविध राज्यांतील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यातील अनेकजण मतदारही आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपने विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका, घरी जाऊन संवाद आयोजित करून प्रचार सुरू केला आहे.

शहरात गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. ठरावीक मतदार केंद्रित करून अनेक छोटे मेळावे आयोजित केले जात आहेत. शहरात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू कश्मीर, दक्षिण भारतातील राज्‍यातून आलेले नागरिक रोजगाराच्या निमित्ताने स्थिरावले आहेत. या नागरिकांचे पुण्यात मतदान असल्याने भाजपने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी स्वतंत्रपणे मारवाडी, राजस्थानी नागरिकांचे मेळावे घेतले आहेत. उत्तर भारतीयांची संख्या लक्षात घेता उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, ब्रिजेश पाठक यांचेही मेळावे झाले आहेत. त्याचप्रमाणे केरळच्या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उदया वेणुगोपाल, जम्मू कश्मिराच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता डोगरा यांनी महिलांचे मेळावे व बैठका घेतल्या आहेत.

पुण्यात राजस्थान भवन बांधले जावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. मुरलीधर मोहोळ निवडून आल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा करतील. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे, यासाठी पुण्यातील राजस्थानी बांधवांनी भाजपला मतदान करावे.
- भजनलाल शर्मा, मुख्यमंत्री, राजस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT