पुणे

चुकीचा संदेश प्रसारित केल्याबद्दल एकावर गुन्हा

CD

पुणे, ता. १० : मतदार यादीतील नावावर डिलीट असा शिक्का मारला असल्यास करायच्या कार्यवाहीच्या माहितीबाबतचा चुकीचा संदेश व्हॉट्सअपद्वारे प्रसारित केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. असे चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे पसरविला आहे. अशा संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. या संदेशामुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती. म्हणूनच प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. असे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून, अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT