पुणे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांकडून आढावा

CD

पुणे, ता. १० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शहर आणि जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस महासंचालक शुक्ला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी आढावा बैठक पार पडली. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सक्सेना, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे शहरचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. १३) रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस महासंचालक शुक्ला यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT