पुणे

जातीपातीच्या राजकारणातून बाहेर या

CD

पुणे, ता. १० : “अनेक नेते तुम्हाला जाणीवपूर्वक जाती-पातीमध्ये गुंतवून ठेवत आहेत. त्यातून तुमच्या हाताला काहीही लागणार नाही. या जाती-पातीच्या राजकारणातून बाहेर या,” असे आवाहन करत “पुण्याच्या विकासाचे वेळेत नियोजन करावे. ते न झाल्यास पुण्यासारख्या टुमदार शहराची वाट लागायला वेळ लागणार नाही,” अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी मोहोळ यांच्यासह खासदार मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, साईनाथ बाबर, दीपक मानकर, प्रमोद भानगिरे, सचिन खरात आणि अमित ठाकरे आदी व्यासपीठावर होते.

पुण्यात का सभा घेतली?
पुणे हे विद्वानांचे शहर आहे. एकाच शहरात सगळ्यात जास्त विद्यापीठ असणारे हे पुणे आहे. तरुणांचे शहर आहे. मोठा सांस्कृतिक वारसा याला मिळाला आहे. अशा शहरात पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाने मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी ही सभा पुण्यात घेतली.

पुण्याबद्दलची चिंता
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त करत ठाकरे म्हणाले, “शहराची लोकसंख्या ७० लाख आणि वाहने ७२ लाख आहेत. गेल्या दहा वर्षांत ३० लाख स्थलांतरित लोक पुण्यात आले. मुंबईची वाट लागण्यासाठी काही काळ जावा लागला. पण पुणे ज्या वेगाने वाढतेय त्यावरून त्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यासाठी शहर नियोजन महत्त्वाचे आहे. अन्यथा ही शहरे फुटतील. उद्ध्वस्त होतील. या शहरांच्या नियोजनाकडे लक्ष जाऊ नये म्हणून अनेक नेते जाणीवपूर्वक तुम्हाला जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवत आहेत. त्यातून बाहेर या. पूर्वी पुणे हे टुमदार शहर होते. आज पुण्याची अवस्था काय झाली आहे?”

अजित पवारांनी जातीचे राजकारण केले नाही
“महाराष्ट्रात १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर राज्यात जातीचे विष कालवले गेले. काही मुद्द्यांवरून माझे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मतभेद असतील. मात्र त्यांनी राज्यात जातीचे राजकारण कधीच केले नाही,” अशा शब्दांत ठाकरेंनी पवार यांची स्तुती केली.

तर मी पण फतवा काढतो
“काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून फतवे काढले जात आहेत. तेथे फतवे काढले जात असतील तर हा राज ठाकरे आज फतवा काढतो, की महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदार करा,” असे ठाकरे यांनी सांगितले.
PNE24U19001

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT