पुणे

गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

CD

पुणे, ता. ११ : पुणे लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊन नये, यासाठी गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर पडलेले सराईत, तसेच त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत टोळक्यांकडून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच गोळीबाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी (ता. १३) आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दररोज मध्यरात्री पोलिसांकडून तपासणी मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात येत असून, गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी, लोणी काळभोर परिसरातील सरार्इतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून दररोज रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागांतील सरार्इतांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सरार्इतांची माहिती त्वरित नजीकचे पोलिस ठाणे किंवा पोलिस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्यातील पथके सहभागी झाली आहेत. पोलिसांकडून शहरातील वेगवेगळ्या भागात सरार्इतांची तपासणी करण्यात येत आहे.
- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT