पुणे

निवडणूक कामातून सूट मिळावी

CD

पुणे, ता. ११ : मतदानाच्या दिवशी १२ तासांच्या कामासाठी अत्यल्प मानधन दिले जाईल, असे आशा वर्करला तोंडी सांगण्यात आले आहे. तसेच वेगळा प्रवास भत्ता किंवा जेवणाची व्यवस्था केली जात नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे निवडणूक कामातून सूट मिळावी, अशी मागणी आशा वर्कर यांनी केली आहे.
१२ तासांच्या ड्यूटीसाठी केवळ २०० रुपयांचे मानधन दिले जाईल, असे आशा वर्करला तोंडी सांगण्यात आले आहे. त्यांच्यासाठी वेगळा प्रवास भत्ता किंवा जेवणाची व्यवस्था केलेली नाही. आशा वर्कर यांना सध्या कोणतीच वेतनश्रेणी लागू नाही. अनेक आशा वर्करची त्यांच्या घरापासून लांबच्या मतदान केंद्रांवर नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्रवास खर्चासाठी पदरमोड करावी लागेल. तसेच त्यांना कामावर आधारित मोबदला मिळत असल्याने, त्यादिवशी त्यांना काम करता येणार नाही आणि त्यांचा मोबदला देखील मिळणार नाही, अशी माहिती ‘आशा वर्कर्स युनियन’च्या सचिव किरण मोघे यांनी दिली.

आशा वर्कर्स युनियनच्या मागण्या
- किमान ७०० रुपये मानधन किंवा चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेले वेतन मिळावे
- प्रवास व दैनिक भत्ता मिळावा
- अपंग, वृद्ध आणि आजारपण अशी वैयक्तिक कारणे असलेल्यांना कामातून सूट मिळावी
- आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदानाची व्यवस्था करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT