पुणे

‘सी-व्हिजिल’ ॲपवर दीड हजार तक्रारी दाखल

CD

पुणे, ता. ११ : लोकसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या एक हजार ५०५ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी एक हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर तथ्य न आढळलेल्या उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘सी-व्हिजिल’ कक्ष कार्यान्वित आहे. ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.

जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ ‘सी-व्हिजिल’ ॲपवर अपलोड करावी याचबरोबर जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT