पुणे

स्वायत्त महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा घोषित

CD

स्वायत्त महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा घोषित
‘एनईपी’नुसार प्रवेश; बहुतेकांना मे अखेरपर्यंत मुदत
पुणे, ता. १२ : शहरातील स्वायत्त महाविद्यालयांतील प्रवेश परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी ३० मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात येऊ इच्छिणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा महत्त्वपूर्ण ठरते. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) ही प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.
‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक नामवंत महाविद्यालये आहेत. त्यातील काही महाविद्यालये स्वायत्त झाली असून, प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षेचेही आयोजन करतात. नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही प्रवेश परीक्षेची घोषणा केली असून, अर्जांसाठी २० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर आता स्वायत्त महाविद्यालयांतही प्रवेश परीक्षा पार पडत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील कला आणि विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. यासाठी ३० मेपर्यंत अर्ज करता येईल. तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयानेही त्यांच्या प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांना स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, ऑनलाइन अर्जासाठी ९ जूनपर्यंत मुदत आहे. वाडिया महाविद्यालयानेही काही एम.एस्सी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. त्यासाठीही ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे काय?
- सुट्टीच्या काळात गाफील राहू नका
- पुढच्या प्रवेशाच्या दृष्टीने ऑनलाइन प्रवेश परीक्षांची माहिती घ्या
- अनेक अर्जांची मुदत मे महिन्यातच संपत असल्याने तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
- पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा
- प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम तपासून त्या दृष्टीने तयारी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update: धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT