पुणे

महाविद्यालये २० जूनला उघडणार

CD

पुणे, ता. १२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांचे पहिले सत्र २० जूनपासून सुरू होत आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान असतील. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विद्यापीठाकडून शैक्षणिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.
कोरोनानंतर मागील तीन वर्षे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. यंदा उन्हाळी सत्राच्या परीक्षा वेळेवर पार पडत असून, पुढील शैक्षणिक वर्ष पूर्ववत होईल, असा विश्‍वास विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकतेच विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विद्याशाखा आणि आतंरविद्याशाखांचे शैक्षणिक वेळापत्रक घोषित केले आहे. ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांशिवाय बहुतेक सर्व महाविद्यालये २० जून रोजी सुरू होत आहे. तर औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तुशास्त्राची महाविद्यालये १ जुलैपर्यंत सुरू होणार आहेत. बहुतेक पदवी अभ्यासक्रम १ ते १८ जुलै दरम्यान सुरू होणार आहे. पुढील उन्हाळी सत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचा विचार आहे. तर उन्हाळी सत्राच्या परीक्षा एप्रिल- मे २०२५ मध्ये घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

महत्त्वाच्या तारखा
२० जून ते २१ ऑक्टोबर २०२४
पावसाळी (विषम सत्रे) सत्राचा कालावधी

२ डिसेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२५
उन्हाळी (सम सत्रे) सत्राचा कालावधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

SCROLL FOR NEXT