पुणे

अमेरिकेने टेकले हात, पुण्याने दिली साथ

CD

पुणे, ता. १२ : अमेरिकेतील जेरेमी बेनाईट हा २० वर्षांचा मुलगा. तास-तासभर शौचास बसल्याशिवाय त्याचे पोट साफ होत नव्हते. अमेरिकेत वेगवेगळ्या डॉक्टरांनी तपासले, विविध वैद्यकीय चाचण्या केल्या, उपचाराचे प्रयत्न झाले. पण मूळ दुखणे काही केल्या बरे होईना. अखेर आईने मुलाला घेऊन पुण्याचा रस्ता धरला.

जेरेमीच्या आईलाही झालेल्या ‘भगंदर’वर अमेरिकेत अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पण, त्यांचा आजार काही बरा होत नव्हता. तेथील डॉक्टरांनी पोटावर शौचाची पिशवी बांधलेली. अशा स्थितीत ती महिनोंमहिने जगत होती. अशा वेळी तिला पुण्यातील डॉक्टरांची माहिती इंटरनेटवर मिळाली. ती पुण्यात आली. दरम्यानच्या काळात तिच्या मुलाला पोट साफ न होण्याचा त्रास सुरू होताच. तेथील डॉक्टर प्रयत्न करत होते. पण, त्या आजारातून काही केल्या तरुण मुलाची सुटका होत नव्हती. त्यामुळे आई त्याला घेऊन अखेर पुण्यात आली.

काय झाले होते?
जेरेमी या तरुणाला ‘रेक्टल प्रोलॅप्स’चा (गुदभ्रंश) त्रास झाला होता. त्यामुळे तासन् तास शौचास बसूनही त्याचे पोट साफ होत नव्हते. सामान्यतः हा विकार जन्मतः असू शकतो. तसेच, बऱ्याच दिवसांपासूनची बद्धकोष्ठता किंवा पोट साफ करताना जास्ती जोर लावावा लागणे, खूप दिवस सुरू असलेला खोकला किंवा मेंदूविकारामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच, त्याला मूत्रविसर्जनातही अडथळे होते. याला वैद्यकीय परिभाषेत ‘अँनोल्ड चियारी सिंड्रोम’ म्हटले जाते.

परिणाम काय झालेला?
या आजारांमुळे त्याचे शिक्षण थांबले होते. घराबाहेर पडणे अशक्यप्राय झाले होते. त्याला कोणत्याही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे या तरुण मुलाचे आयुष्य फक्त घरापुरते मर्यादित झाले होते.

कसे केले उपचार?
या विकारावर पारंपारिक पद्धतीने पोटावर छेद घेऊन ही शस्त्रक्रिया करावी लागत होती. हिलिंग हँड्स क्लिनिकचे कोलोरेक्टल सर्जन डॉ. आश्विन पोरवाल यांनी विकसित केलेल्या ‘टीआरआरपीसीएस’ (ट्रान्सएनल रेक्टल रीसेकंक्शन फॉर प्रोलॅप्स बाय सर्कुलर स्टेपलर) शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.

ही शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या शरीरावर कोणताही छेद घेतला नाही. त्यामुळे रुग्णाला भूल देणेही सोपे गेले. काही रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया सकाळी करून दुपारनंतर रुग्णाला घरीही सोडता येते. या रुग्णावर ‘पुडेंडल ब्लॉक’ म्हणजे जागच्या जागी भूल देऊन ही शस्त्रक्रिया करता आली. कोणतीही दातांची शस्त्रक्रिया करताना रुग्णाला जागेवरच भूल देऊन ही केली जाते, त्याच पद्धतीने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया केल्या दिवसापासून त्याचे पोट साफ करायला फक्त सात ते आठ मिनिटे लागत होती. तसेच लघवी करणे ही एकदम सोपे गेले. जे त्याला इतके वर्षात कधीही करता आले नाही.
- डॉ. आश्विन पोरवाल, कोलोरेक्टल सर्जन, हिलिंग हँड्स क्लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT