shura mi vandile music concert pune Sakal
पुणे

मास्टर दीनानाथांवर आधारित ‘सूरां मी वंदिले’ मैफील

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर यांसह बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात प्रवेशिका लवकरच उपलब्ध होतील.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित ‘सूरां मी वंदिले’ हा आगळावेगळा कार्यक्रम सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने पुणेकरांना स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली आणि विदुषी मंजुषा पाटील या दोन प्रतिभावंत गायकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

वीर सेनानी फाउंडेशन आणि स्वरनिनाद फाउंडेशनच्या सहकार्याने हा २५ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही सुरेल मैफील रंगणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका मात्र आवश्यक आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर यांसह बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात प्रवेशिका लवकरच उपलब्ध होतील.

ही मैफील संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या प्रगल्भ शास्त्रीय गायकी, नाट्यगीते आणि दुर्मीळ बंदिशीवर आधारित आहे. या रचनांसह मास्टर दीनानाथ यांचे दुर्मीळ नाट्यप्रवेशही मैफिली दरम्यान दाखविले जाणार आहेत. दिवंगत गायक उस्ताद राशिद खाँ यांच्यासह पं. सुरेश वाडकर, अशोक पत्की, हरिहरन, पं. रोणू मुजुमदार आदी दिग्गजांच्या चित्रफितींचाही या कार्यक्रमात समावेश असेल.

पं. बलवल्ली आणि मंजुषा सर्व रचना सादर करणार असून त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, पखावजवर दादा परब, ऑर्गनवर मकरंद कुंडले, संवादिनीवर अभिनय रवांदे हे कलाकार साथसंगत करणार आहेत. विघ्नेश जोशी हे निवदेन करणार आहेत.
पं. बलवल्ली हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आघाडीचे प्रतिभावान गायक आहेत.

मास्टर दीनानाथ यांच्यासारखीच अत्यंत सुरेल, भावनाप्रधान आणि तितकीच आक्रमक गायनशैली असलेल्या पं. बलवल्ली यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मंजुषा या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या गायिका. देशातील बहुतांश प्रतिष्ठित राष्ट्रीय संगीत महोत्सवांसह इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर आदी देशांमध्ये त्यांच्या मैफिली रंगल्या आहेत. तरी अधिकाधिक रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT