पुणे

पुण्यातील मतदान केंद्रांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

CD

पुणे, ता. १२ : गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या वळवाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मतदारसंघातील साहित्य वितरण केंद्र आणि मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी घेतला.

पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूकीसाठी सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देऊन आढावा घेत होते. या भेटी दरम्यान डॉ. दिवसे यांनी संबंधित मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्य वितरण करण्यासाठी केलेले नियोजन आणि मतदान केंद्रांवरील व्यवस्थेची माहिती घेतली. साहित्य वितरण प्रक्रिया वेळेत आणि शांततेत पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाची शक्यता लक्षात घेता ईव्हीएमच्या सुरक्षेबाबतही त्यांनी सूचना दिल्या. पोलिस अधिकाऱ्यांशीदेखील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. शहराच्या मध्यवर्ती भागात मतदान केंद्र परिसरातील वाहनतळ व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT