पुणे

म. श्री. दीक्षित जन्मशताब्दी सांगता सोहळा गुरुवारी

CD

पुणे, ता. १२ : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे लेखक, संपादक आणि पुण्याचा चालता-बोलता इतिहास म्हणून सर्वज्ञात असलेले म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा गुरुवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी मसापला दिलेल्या देणगीतून पहिला ‘म. श्री. दीक्षित स्नेहबंध पुरस्कार’ याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मसापच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात ४४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ग्रंथसेविका विमल अहिरे आणि मसापच्या कार्यालयात २७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्योत्स्ना नांदगिरीकर यांना जाहीर झाला आहे. तसेच, उत्कर्ष प्रकाशन आणि मसाप यांच्यातर्फे ‘साहित्यिक काका : म. श्री. दीक्षित’ डॉ. मेधा सिधये आणि रवींद्र ठिपसे संपादित पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी होईल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांच्या हक्कासाठीच मोर्चा, महिलेची भाषा असंसदीय, पोलिसांना...; मंत्री महाजनांची पहिली प्रतिक्रिया

Jihe Kathapur Water Scheme : जिहे-कठापूर योजनेत मोठा पाणी घोटाळा? उपलब्धतेपेक्षा जास्त लाभक्षेत्र वाढवल्याचा शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोप; शेतकरी संकटात

Latest Marathi News Live Update: धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका

IPL 2026: CSK संघाला उधारीवर खेळाडू देणार RCB? अश्विनने सुचवलाय मार्ग, पण नेमका Loan चा नियम आहे काय?

'या' लोकप्रिय मराठी मालिकेनं वर्षभरातच घेतला निरोप! मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली... 'तरुण मुलींना प्रेरित केलं पण...'

SCROLL FOR NEXT