पुणे

पीएमपीच्या ६ हजार फेऱ्या रद्द

CD

पुणे, ता. १२ : पुणे, शिरूर व मावळ लोकसभेसाठी सोमवारी (ता.१३) मतदान होत आहे. मतदानाचे साहित्य व कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीच्या ८१८ बस धावणार आहेत. त्यामुळे रविवारी पीएमपीच्या सुमारे सहा हजार फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारीही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने १२ व १३ मे रोजी मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीच्या ८१८ बस बुक केल्या आहेत. त्यामुळे रविवारी सकाळच्या सत्रात सुमारे ६ हजार फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारी दुपारच्या सत्रात मतदान साहित्याची वाहतूक होणार आहे. त्यामुळे सोमवारी दुपारच्या सत्रातील सहा हजार फेऱ्या रद्द होण्याचा अंदाज आहे. पीएमपी प्रशासनाने यासाठी स्व मालकीच्या सीएनजीवर धावणाऱ्या बसचा वापर केला आहे. पीएमपीची एकूण बस संख्या १६५० इतकी आहे. त्यापैकी ८१८ बस प्रवासी सेवेत नसल्याने मोठ्या प्रमाणात पीएमपीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

पीएमपीच्या ८१८ बस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहरातील प्रवासी सेवेवर काहीसा परिणाम झाला. रविवार असल्याने प्रवाशांची संख्या कमी असते. बसच्या वाहतुकीत कोठेही अडचण आलेली नाही.
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Who is Sanjita Mohapatra? : सत्यम गांधींची तडकाफडकी बदली! आता 'या' डॅशिंग महिला अधिकारी सांभाळणार सांगली महापालिकेचा कारभार

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

SCROLL FOR NEXT