पुणे

क्षणचित्रे

CD

यंदाही मतदान करताना पहिला नंबर
पर्वती विधानसभा मतदारसंघातील स्वारगेटजवळील भैरवसिंह घोरपडे उद्यानाजवळील महर्षी अण्णासाहेब शिंदे प्रशालेतील खोली क्रमांक-९ मध्ये विठ्ठल मेहता (वय, ६४) यांनी यंदाही सर्वप्रथम मतदान केले. त्यासाठी ते सकाळी ६.३० वाजताच मतदान केंद्रावर पोहचले होते. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांनी साक्षीदार म्हणून त्यांना बोलावून ईव्हीएम सील करून कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी मतदान केले. मेहता गेल्या ४० वर्षांपासून मतदान करतात. यंदाची त्यांची २६ वी निवडणूक. या पूर्वीच्या २५ निवडणुकांतही त्यांनी सर्वप्रथम मतदान केले. मेहता म्हणाले, ‘‘मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथम मतदान केंद्रावर पोहचतो. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही माझी भूमिका सांगतो. त्यामुळे त्याचेही मला सहकार्य मिळते.’’
----------------------
केंद्रावर मतदारांची सेवा
महाराष्ट्र ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दिलीप शेलवंते यांनी महर्षीनगरमधील मॅकहेन्री शाळेत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांची यंदा सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून अभिनव सेवा केली. मतदान केंद्राच्या आवारात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आल्यावर शेलवंते त्यांना मतदान खोलीपर्यंत घेऊन जात होते. त्यांनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदारांची सेवा केली. शेलवंते म्हणाले, ‘‘मतदान केंद्रात मतदानाच्या १८ खोल्या होत्या. तेथे पोहचल्यावर खोली क्रमांक शोधायला नागरिकांचा वेळ जात होता. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग त्यांनाही अडचण येत होती. व्हिलचेअरवरून आलेल्यांनाही मदतीची गरज होती. हे बघून मी थांबलो आणि या मतदारांची सेवा केली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT