पुणे

‘एआय’ वापरून बना यूट्यूबर

CD

पुणे, ता. १३ : शिवाजी कचरे यांची उत्तम यूट्यूबर कसे व्हावे व त्यासाठी ‘एआय’चा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणारी दोन वीकेंडला चालणारी चार दिवसांची कार्यशाळा १८ मेपासून आयोजित केली आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत युट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वतःचे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये ‘एआय’चा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती ‘एआय’ साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२


शिका मोडी लिपी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध लिपी आहे. पूर्वी ती शीघ्रलेखानासाठी वापरली जात असे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. या उद्देशाने २१ मे रोजी मोडी लिपी अक्षर ओळख कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोडी लिपीचा इतिहास मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच प्रिंटेड व इ-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ही कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. मोडी लिपीमध्ये लिहिण्याची वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT