पुणे

‘सीबीएसई’च्या दहावीची टक्केवारी ९३.६०

CD

पुणे, ता. १३ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी अचानकपणे जाहीर करण्यात आला. यात दहावीचे ९३.६० टक्के, तर बारावीमधील ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन्ही निकालांच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली. दहावीचा ०.४८, तर बारावीचा ०.६५ टक्के इतका वाढला. दोन्ही परीक्षांत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. दहावीत मुलींची ९४.७५, तर मुलांची ९२.७१ इतकी टक्केवारी आहे. बारावीत हे आकडे अनुक्रमे ९१.५२ आणि ८५.१२ असे आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ७२४ शाळांमधील २२ लाख ५१ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २२ लाख ३८ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या ४७ हजार ९८३ विद्यार्थ्यांना ९५ टक्के किंवा त्याहून जास्त, तर दोन लाख १२ हजार ३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळाले.
बारावीच्या परीक्षेसाठी १८ हजार ४१७ शाळांमधून १६ लाख ३३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या २४ हजार ६८ विद्यार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त, तर एक लाख १६ हजार १४५ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त टक्के मिळाले.
...........
निकालाची आकडेवारी
परीक्षा : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
दहावी : १,०७,८३३ : १,०७,६५५ : १,०३,९१६ : ९६.५३ टक्के
बारावी : ३२,५६१ : ३२,३४६ : २९,०३६ : ८९.७७ टक्के
.........
पुणे विभागाचा निकाल
परीक्षा : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण विद्यार्थी : टक्केवारी
दहावी : १,१०,६८५ : १,१०,४९८ : १,०६,५८५ : ९६.४६ टक्के
बारावी : ३४,७१५ : ३४,४९४ : ३०,९६९ : ८९.७८ टक्के
(पुणे विभाग : महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली)
...............
‘सीबीएसई’चे धक्कातंत्र कायम
वास्तविक निकाल अचानक जाहीर करण्याची ‘सीबीएसई’ची दरवर्षीची परंपरा आहे. यंदा मात्र निकाल २० मे नंतर निकाल जाहीर होईल असे दहा दिवसांपूर्वी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात सात दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला. अशाप्रकारे ‘सीबीएसई’ने धक्कातंत्र कायम ठेवले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT