पुणे

अखिल गोंधळी संघटनेतर्फे संबळ वादन वर्गाचे उद्‍घाटन

CD

पुणे, ता. १३ : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना तसेच गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ यांच्या वतीने सुरु केलेल्या गोंधळ कला संबळ वादन प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन वाद्यपूजनाने करण्यात आले. शाहीर हेमंतराज मावळे यांच्या हस्ते रविवारी (ता. १२) उद्‍घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडकर व श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्टचे विश्र्वस्त मंगेश जेजुरीकर उपस्थित होते.
शाहीर मावळे यांनी तानाजी मालुसरे यांचा पोवाडा सादर केला. पोवाड्यातून गोंधळ कलेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी लकडीपूल विठ्ठल मंदिराचे विश्र्वस्त दीपक थोरात, श्री पासोड्या विठ्ठल मंदिराचे विश्र्वस्त रवींद्र पठाले, वारकरी सेवा संघ, आळंदीचे विश्र्वस्त हेमंत निरवळ, नागनाथपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे प्रतीक केदारी आदी उपस्थित होते. एरंडवणे येथील दीनानाथ मंगेश रुग्णालयाजवळील पटवर्धन बाग येथे असलेल्या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात २६ मे पर्यंत संबळ वादन प्रशिक्षण वर्ग मोफत असणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष परेश गरुड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मुकुंद यदमाळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Latest Marathi News Live Update: मुक्ताईनगर ते कु-हा मार्गावर पुन्हा वाघाचे दर्शन, वाहनधारकांची उडाली तारांबळ

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT