पुणे

मुंबईतील पावसाचा रेल्वे प्रवाशांना फटका

CD

पुणे, ता. १३ ः मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका केवळ उपनगरीयच नव्हे तर पुण्याच्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांनाही बसला. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळित झाले. एकूण १३ गाड्यांना उशीर झाला. ठाणे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा (ओएचइ) खांब पडल्याने लोकल सेवा विस्कळित झाली.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. सायंकाळी पाच वाजल्यानंतर यंत्रणा पूर्ववत झाली. त्यानंतर या गाड्या पुण्याकडे मार्गस्थ झाल्या. याशिवाय पुणे ते लोणावळा व पुणे ते उरुळी दरम्यानही ‘ओएचइ’ बिघाडामुळे काही गाड्यांना उशीर झाला.
मुंबईतील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. एका वायर मध्ये बिघाड झाल्याने त्याचा थेट परिणाम लोणावळ्याजवळील दुसऱ्या ‘ओएचइ’वर झाला. लोणावळा ते पुणे दरम्यानच्या ‘ओएचइ’वर अतिरिक्त ताण पडला. त्यामुळे वीज प्रवाह तीन ते चार वेळा खंडित होण्याच्या घटना घडल्या.
पुणे ते दौंड विभागातील उरुळी स्थानकाजवळही ‘ओएचइ’ मधून ठिणग्या पडल्याचे प्रकार घडले. या सर्व बिघाडांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. सर्वाधिक उशीर मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसला झाला.

या गाड्यांना उशीर
१. प्रगती : १ तास ३२ मिनिटे
२. डेक्कन क्वीन : १ तास १४ मिनिटे
३. सिंहगड : ५३ मिनिटे
४. मुंबई-चेन्नई : ७० मिनिटे
५. मुंबई-भुवनेश्वर : ४० मिनिटे
६. मुंबई-हैदराबाद : ४५ मिनिटे : २० मिनिटे
७. पनवेल-नांदेड : ३० मिनिटे
८. बिकानेर-यशवंतपूर : २७ मिनिटे
९. मुंबई-सोलापूर वंदे भारत : ५० मिनिटे
१०. पुणे-मुंबई-डेक्कन : ४० मिनिटे
११. नागरकोईल-मुंबई : ३५ मिनिटे
१२. दौंड-इंदूर : ३० मिनिटे
१३. पुणे-संत्रागच्छी : ३० मिनिटे
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT